Posts

गावाकडची वाट !!

शेवटी आज मुहूर्त लागला गावाला जायचा आणि त्यात एस.टी चं reservation सुद्धा केलं होतं त्यामुळे प्रवास अगदी निवांत झाला गावच्या घरी पोहचल्या-पोहचल्या काकू ने चहा दिला, आणि मग अवरून वगैरे निघालो एकटा भटकत फिरत-फिरत शेताची वाट धरली आज चक्क पंधरा वर्षांनी माझी पाऊलं त्या वाटेवर पडली मातीचा तो गंध अजून तसाच टिकून राहिला होता वाटेच्या कडेला असणारं चिंचेचं झाड  मला लहानपणीच्या आठवणी सांगत होतं सगळं अगदी तसंच होतं वाटेकडेची ती झाडं त्या दोन विहिरी दिसायला अगदी सारख्या, जणू जुळ्या बहिणीच आणि आता मोठा झालोय तरीही आजीला गोष्ट सांगायला लावली तीच आपली राजा-राणीची आणि शेवटी तिच्या मांडीवर डोकं ठेऊन तसाच झोपी गेलो आता बहुतेक कामामुळे तशी झोप पुन्हा कधीच लागणार नाही कामाच्या आणि आयुष्याच्या या भागदौडीत गावाकडे यायला जमतंच नव्हतं पण आता सारखं येण्याचा प्रयत्न करीन आणि अजून कितीही लांब गेलो तरीही ही गावाकडची वाट मनातून कधीच भरकटणार नाही एवढं नक्की !!!! - Omkar Bokil

ये जो अपने हैं

ये जो अपने हैं, वो भी हमे छोडकर जाने वाले हैं जब जरुरत हो, तो ही हमारे पास आने वाले हैं बडे बडे वादे किए थे उन्होंने इस रिश्ते को लेकर वादे तो उन्होंने किये थे, लेकीन उन्हे हम निभाने वाले हैं अब तो धोखे इतने खाए हैं की, हम अपनी जुबान से खुद ही मुकरने वाले हैं डर तो खर्चे का हैं सहाब क्योकि, पुरे घर में हम अकेले ही कमाने वाले हैं जिंदगी में कुछ करना तो दुर की बात, एक कदम भी आगे नही बढ़ने देते ऐसे बुजदिल जमाने वाले हैं लेकीन हम भी पीछे नही हटेंगे सहाब एक ना एक दिन कुछ बडा करने वाले हैं - Omkar Bokil

तु माझ्यात गुंग, मी तुझ्यात नाही !!

तु माझ्यात गुंग मी तुझ्यात नाही होऊन गेले सारे उरले नाही काही तुला मी चोहीकडे दिसायचो मला तु दिसलीच नाही बोलून गेलो सारे ज्याला अर्थच नव्हता काही तु प्रेमात भरारी घेतलीस मी गगनाकडे बघितलं सुद्धा नाही तु त्या हवेत गुंतली होतीस मला ती झुळुक जाणवली सुद्धा नाही                                                        - Omkar Bokil